जवळार्जुन येथे ८१५ जणांची मोफत नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:45+5:302021-07-01T04:08:45+5:30
अजित युवा प्रतिष्ठान, जवळार्जुन ग्रामपंचायत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील अस्मिता भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदर राष्ट्रवादी ...
अजित युवा प्रतिष्ठान, जवळार्जुन ग्रामपंचायत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील अस्मिता भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या हस्ते केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक टेकवडे होते. यावेळी बोलताना टेकवडे म्हणाले की, जवळार्जुन हे गाव संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव लोकनेते शरद पवार यांनी दत्तक घेतले. त्यांनी संपूर्ण गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. मोठ्या प्रमाणावर येथे विकासकामे पूर्ण झाली आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खा. सुप्रिया सुळे यांचाच पुढाकार असल्याने त्यांच्याविषयी ग्रामस्थांत कृतज्ञता आहे.
नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. संतोष रणनवरे व डॉ. तमन्ना शेख यांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या.
यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे, राजेंद्र धुमाळ, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, जेष्ठ नेते सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन टेकवडे, संगीता राणे, संगीता टेकवडे, पोलीस पाटील श्रीकांत राणे, शशिकांत टेकवडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत सरपंच सोमनाथ कणसे यांनी केले, आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी मानले.
३०जेजुरी
रुग्णांची नेत्र तपासणी करताना नेत्ररोग तज्ज्ञ.