पिंपळीत मोफत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:27+5:302021-07-30T04:09:27+5:30
फिरता दवाखाना या उपक्रमाचे स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले. आवश्यकतेनुसार औषधे ही मोफत वाटप करण्यात आली. तपासणी दरम्यान ...
फिरता दवाखाना या उपक्रमाचे स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले. आवश्यकतेनुसार औषधे ही मोफत वाटप करण्यात आली. तपासणी दरम्यान काही दुर्धर आजारग्रस्त नागरिकांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्यावर पुढील उपचारदेखील मोफत केले जाणार असल्याचे या वेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे छत्रपती कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाण-पाटील यांनी कौतुक करून गावातील नागरिकांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचे आभार मानले. या वेळी खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन भाऊसो भिसे, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच राहुल बनकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनील बनसोडे, रमेशराव ढवाण पाटील, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, सदस्य आबासाहेब देवकाते पाटील, अजित थोरात, सदस्या स्वाती ढवाण पाटील, अश्विनी बनसोडे, कोमल टेंबरे, मंगल खिलारे, मीनाक्षी देवकाते, निर्मला यादव, आमदार रोहित पवार यांचे सहाय्यक हनुमंत होले, पिंपळी शाळा नियोजन समिती अध्यक्ष बापू केसकर, हरिभाऊ केसकर, अशोक ढवाण पाटील, सोना देवकाते पाटील, कालिदास खोमणे, शैलेश थोरात, नंदकुमार बाबर, कल्याण राजगुरू उपस्थित होते.
फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
२९०७२०२१ बारामती—०६