दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:31+5:302021-06-20T04:08:31+5:30
सध्या कोरोना महामारीने सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संभाव्य तिसरी लाटेची शक्यता वर्तविली ...
सध्या कोरोना महामारीने सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संभाव्य तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट लहान मुलांना धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू प्रतिष्ठानने लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत सुमारे दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी सांगितले
या शिबिरामध्ये शहरातील ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, वजन, उंची, कॅल्शियम, हाडांची तपासणी करून एक्स-रे काढण्यात आले. शिबिरामध्ये मुलांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले असून, सहभागी मुलांना मास्क व खाऊ देण्यात आला असल्याचे अनिल सोनवणे यांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलांच्या वाढत्या वयानुसार वजन व उंची योग्यप्रमाणे वाढ होते की, नाही याची मोफत तपासणी करण्यात येते व त्यांना मोफत औषधे दिले जात असल्याचे डॉक्टर संध्या गायकवाड यांनी सांगितले.