ॲडव्हॅनटिस रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:10 AM2021-04-11T04:10:05+5:302021-04-11T04:10:05+5:30
पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मधील ऍडव्हॅनटिस रुग्णालयामध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ...
पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मधील ऍडव्हॅनटिस रुग्णालयामध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या काजल आंबेडकर यांना पहिली लस देण्यात आली.
यावेळी माजी सभागृह नेते आणि नगरसेवक श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका वंदना भिमाले, रमेश बिबवे, चेतन चावीर, अविनाश चोपडे, ओंकार अकाले, सतीश काळे, सुशील लोंढे, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अनुप हलदार, डॉ. तिमती फिलीप, डॉ. फिलिप्स, संतोष वर्गीस आदी उपस्थित होते.
पालिकेकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. सॅलसबरी पार्क, महर्षीनगर, मुकुंदनगर, डायस प्लॉट व प्रभागातील नागरिकांना या केंद्राचा फायदा मिळणार आहे. नागरिकांना सकाळी १० ते दुपारी १.३० व दुपारी २.०० ते ३.३० वाजेपर्यंत या केंद्रावर लस घेता येणार आहे.