एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 06:25 PM2018-09-12T18:25:46+5:302018-09-12T18:39:36+5:30

एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात.

free journey for ST retired emplyees | एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’

Next
ठळक मुद्देव्यवस्थापनाचा  निर्णय : सपत्नीक मोफत प्रवासाची मिळणार सुविधावर्षातील सहा महिने सपत्नीक मोफत प्रवास देण्याची गोड घोषणा

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने सपत्नीक मोफत प्रवास देण्याची गोड घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी मागणी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे.
एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या २५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पासची मागणी केली आहे. एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची ‘सशुल्क’का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रावते यांच्याकडे केली होती. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी या योजनेस संमती दिली आहे. गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेची घोषणा करीत एसटी प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गोड ‘प्रसाद’ देऊ केला आहे. 

Web Title: free journey for ST retired emplyees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.