रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना शंभर रुपर्यांत मोफत रिक्षा प्रवास; पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 07:48 PM2024-08-18T19:48:01+5:302024-08-18T19:48:15+5:30

या सर्व रिक्षातून महिलाना फायदा मिळणार आहे.

Free rickshaw travel up to 100 for women passengers on the occasion of Rakshabandhan | रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना शंभर रुपर्यांत मोफत रिक्षा प्रवास; पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर सुविधा

रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना शंभर रुपर्यांत मोफत रिक्षा प्रवास; पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर सुविधा

पुणे : रक्षाबंधन निमित्त राज्यातून अनेक गावावरून मोठ्या प्रमाणात महिला भावाला राखी बांधण्यासाठी एसटी, रेल्वे नी प्रवास करून येत असतात. पुणे स्टेशन येथून हजारो प्रवाशी शहरातील विविध ठिकाणी लवकर जाण्यासाठी महिला धडपडत असतात. त्यात रिक्षानी जाणे परवडत नाही त्यामुळे बसची वाट पाहावी लागते.

यामुळे रक्षाबंधन निमित्त सोमवारी ( दि. १९) ऑगस्टला सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना १०० रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आली आहे. याठिकाणी शहरातील आतापर्यत ८०० रिक्षा पुणे स्टेशन वरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे. या सर्व रिक्षातून महिलाना फायदा मिळणार आहे.

यावेळी रिक्षाचालक बांधवा तर्फे महिला प्रवाशांना रक्षाबंधनाची छोटीशी भेट असून याचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी केले आहे.

Web Title: Free rickshaw travel up to 100 for women passengers on the occasion of Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.