दिव्यांगांना मिळणार घरपोच मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:20 AM2018-02-20T07:20:32+5:302018-02-20T07:20:35+5:30
पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांना सरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे
पुणे : पुरंदर तालुक्यात एक हजार ५९ अपंगांची आॅनलाइन नोदणी झाली आहे. त्यातील गरजू अपंगांना
सरसकट संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देऊन अन्नसुरक्षा यादीमध्ये त्यांना प्राधान्य देणार आहे. ज्या अपंगांना अवयवाची कमतरता असल्याने ते शासकीय कार्यालयामध्ये येऊ शकत नाही, अशा अपंगांसाठी शासकीय योजनांचा लाभ घरपोच कशा देता येतील. यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत नायब तहसीलदार संजय काटकर यांनी व्यक्त केले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यात रानमळा (जगतापवस्ती) येथे अपंगांना मार्गदर्शन मेळावा आयोजिला होता.
या मेळाव्याप्रसंगी प्रामुख्याने अपंगांना एसटी पास, रेल्वे पास व शासनातर्फे अपंगांची ओळख
म्हणून व शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड,
संजय गांधी, इंदिरा गांधी आवास योजनांचा फॉर्म भरून घेऊन ५० लोकांना युडीआयडी कार्डवाटप करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी युडीआयडी फॉर्म ८०, एसटी पास १६७, रेल्वे पास फॉर्म २०४ संजय गांधी व इंदिरा गांधी ४२ फॉर्म भरून घेण्यात आले. हा मेळावा प्रहार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
या वेळी पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय काळे, नायब तहसीलदार संजय काटकर, पुरवठा अधिकारी चंद्रशेखर दगडे,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेन्द्र सातव, माजी उपसभापती माणिक झेंडे रानमळा सरपंच सुनंदा कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व पदाधिकारी सुरेश जगताप, कल्पना गुरव, दिलीप भोसले, फिरोज पठाण, दत्ता दगडे यांनी केले होते.
या वेळी नरेंद्र कुदळे, संदीप कुदळे, विशाल कुदळे, खुशाल
कुदळे, सुरेश भोसले, भानुदास जगताप, डॉ. सचिन जगताप सुनील कापरे, नीता जगताप, जीवन टोपे, शरद जाधव, मीना लोहकरे, सुनील शिंदे तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.