लसीकरणासाठी ज्येष्ठांची ने-आण करण्यासाठी मोफत एसटीची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:22+5:302021-04-07T04:11:22+5:30
मार्गासनी : कोवीड लसीकरण मोफत सुरू असतानाही नागरिकांकडून भितीपोटी त्याला प्रतिसाद कमी मिळतो आहे. त्यात जर लसीकरण केंद्र लांब ...
मार्गासनी : कोवीड लसीकरण मोफत सुरू असतानाही नागरिकांकडून भितीपोटी त्याला प्रतिसाद कमी मिळतो आहे. त्यात जर लसीकरण केंद्र लांब असले व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना दुसऱ्या गावात लसीकरणासाठी जावे लागत असेल तर प्रतिसाद आणखी घटतो. नेमकी हीच गोष्ट ओळखून वेल्हे येथील जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी वाड्या वस्त्यांवरील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरणाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत एसटी बसची सोय केली. त्यामुळे नलावडे हे जणू या नागरिकांसाठी देवतूनत बनले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पानशेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या लसीकरण सुरू आहे. त्या परिसरातील बावीस गावांमधून ज्येष्ठ नागरिक येत आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काही जेष्ठ नागरिक लसीकरणाच्या केंद्रावर येत नाहीत . त्यामुळे हे नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नयेत यासाठी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी येथील २२ गावांमधील ज्येष्ठ नागरिकांना केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी मोफत एसटी बस ची सोय केली.
पानशेत परिसरातील अनेक गावे दुर्गम आणि डोंगराळ भागात आहेत घोल, दापसरे, खानू, चांदर, कुरवटी, माणगाव, शिरकोली, कशेडी आधीच आदी २२ गावातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक येत आहेत. त्यातील घोल, दापसरे, खानू चांदर हा परिसर अतिशय दुर्गम आणि डोंगरी आहे. येथील नागरिकांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. त्यामळे त्यांच्याकडे केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी पैसे नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी एसटीच्या तिकिटाचे पैसे भरण्याची तयारी दर्शवली व येथील ज्येष्ठ नागरिकांची ने-आण करण्यासाठी एसटी मोफत देण्याचे ठरवले त्यानुसार या गावातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले.
आत्तापर्यंत पानशेत लसीकरण केंद्रावर २१४४ जणांनी लस घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुमावत, आरोग्यसेविका निर्मला गायकवाड, रोषणा कांबळे, यमुना फिरंगवाढ, कल्पना निमजे, आरोग्य सेवक राजेश परदेशी, शिवानंद जठार, सूनिकेत रायकर काम करीत आहेत.
--
फोटो
०६मार्गासने लसीकरणी
फोटो ओळी : दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी एसटी व्यवस्था केल्यावर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद