विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:34 PM2018-08-28T23:34:44+5:302018-08-28T23:35:16+5:30
काळुस : खेड तालुक्यातील काळुस ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत निधीतून गावातील शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून भिवरवस्ती, संगमवाडी व माळवाडी शाळेतील साठ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत खैरे, पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे, उपसरपंच रुपाली खैरे, माजी सरपंच गणेश पवळे, केशव अरगडे, अनिल अरगडे, दत्ता मोरे, बाबाजी खैरे, सुरेश दौंडकर, गणेश गायकवाड, मुकुंद भागीत, सचिन कुंभार, दिलीप देशमुख, एस. आर. सरतापे व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या येथील शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे टॅबची मागणी केली होती. त्यानुसार सरपंच यशवंत खैरे, उपसरपंच रुपाली खैरे व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले. यानिमित्ताने तालुक्याच्या पूर्व भागातील प्रथम डिजिटल शाळा होण्याचा मान मिळवला आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास, तसेच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होणार असल्याचे संतोष कुंभार, रामदास अरगडे, दीपक नाडे, माणिक दिघे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भिवरवस्ती शाळेत करण्यात आलेल्या रंगमंच शेड शाळा रंगकाम आदी सव्वादोन लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मुकुंद गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. दिलीप देशमुख यांनी आभार मानले.