पुणेकरांना फ्री ट्रिप ; शरद पवार यांच्या फॅनचं अनोखं बर्थ डे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 06:27 PM2019-12-12T18:27:51+5:302019-12-12T18:28:58+5:30

एखादी व्यक्ती आवडणं, तिचा प्रभाव पडणं आणि तिच्या प्रेमात असणं याही पलीकडे जाऊन भारतीय त्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्वांवर लोभ ठेवतात. त्यात आवडत्या कलाकाराचे मंदिर बांधण्यापर्यंतही काही चाहते पोहोचले आहेत.

Free trip to Pune; Sharad Pawar's Fan Birthday Gift | पुणेकरांना फ्री ट्रिप ; शरद पवार यांच्या फॅनचं अनोखं बर्थ डे गिफ्ट

पुणेकरांना फ्री ट्रिप ; शरद पवार यांच्या फॅनचं अनोखं बर्थ डे गिफ्ट

googlenewsNext

पुणे : एखादी व्यक्ती आवडणं, तिचा प्रभाव पडणं आणि तिच्या प्रेमात असणं याही पलीकडे जाऊन भारतीय त्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्वांवर लोभ ठेवतात. त्यात आवडत्या कलाकाराचे मंदिर बांधण्यापर्यंतही काही चाहते पोहोचले आहेत. असाच एक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाहता असून त्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क मोफत रिक्षा प्रवास पुणेकरांना देऊ केला आहे. 

संदीप काळे हा युवक पुण्यात रिक्षाचालक आहे. रोजच्या कामाव्यतिरिक्त तो फॅन आहे शरद पवार यांचा. पवार यांचा प्रत्येक कार्यक्रम, सभेला उपस्थित राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पवार यांच्यापर्यंत थेट पोहोचता येईल असे नसले तरी त्यांचा वाढदिवस मात्र तो अभिनव पद्धतीने साजरा करतो. मागील वर्षी त्याने त्या निमित्त कांद्याचे वाटप केले होते. यावर्षी त्याने नवीन उपक्रम राबवला असून दिवसभर त्याने त्याच्या रिक्षात बसणाऱ्या कोणत्याही प्रवाशाकडून भाडे आकारले नाही. एवढेच नाही तर आज पवार यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा अशीही विनंती त्याने प्रवाशांना केली. त्याच्या या उपक्रमाची दखल समाज माध्यमांनी घेतली असून त्याचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

याबाबत संदीप लोकमतशी बोलताना म्हणाला की, 'देशाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा पवार उभे राहिले आहे. कोणी काहीही म्हणाले तरी त्यांचे राजकारण माझ्यासाठी आदर्शवत आहे. शेतकऱ्यांसाठी बांधावर जाणाऱ्या पवार यांच्यासाठी मी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे'.

Web Title: Free trip to Pune; Sharad Pawar's Fan Birthday Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.