संविधान दिनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ; पुणे विद्यापीठातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 05:50 PM2018-11-27T17:50:35+5:302018-11-27T17:53:45+5:30

हरिती प्रकाशनाच्या लाेकांना शहरी नक्षलवादी म्हणत अभाविपकडून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातील पुस्तकांचा स्टाॅल बंद करण्यात अाल्याची घटना समाेर अाली अाहे.

freedom of speech refused on the constitution day ; incident at pune university | संविधान दिनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ; पुणे विद्यापीठातील प्रकार

संविधान दिनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ; पुणे विद्यापीठातील प्रकार

googlenewsNext

पुणे : एखाद्या विचारधारेची पुस्तके वाचने म्हणजे ती व्यक्ती त्या विचारधारेची अाहे असे हाेत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला असताना दुसरीकरडे पुस्तके वाचण्यावरच बंधणे अाणली जात असल्याचे प्रकार समाेर येत अाहेत. त्यातच अाता संविधान दिनी विविध लेखकांची पुस्तके विकणाऱ्या हरिती प्रकाशकांवर शहरी नक्षलवादाची पुस्तके विकत असल्याचा अाराेप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात अाला अाहे. त्यावर एखाद्या विचारधारेच्या विराेधातील पुस्तके विकणे म्हणजे शहरी नक्षलवादाचे समर्थन हाेत नाही असा खुलासा हरिती प्रकाशनाकडून करण्यात अाला अाहे.  

     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साेमवारी अभाविप अाणि एनएसयुअायच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हरिती प्रकाशनचे लाेक विद्यापीठाची परवानगी न घेता शहरी नक्षलवादाचा पुरस्कार करणारी पुस्तके विकत असल्याचा अाराेप अभाविपकडून करण्यात अाला हाेता. यावरुन अभाविप अाणि एनएसयुअायच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हरिती प्रकाशनच्या लाेकांनाही यात धक्काबुक्की करण्यात अाली. पाेलिसांना पाचारण करुन हा वाद मिटवण्यात अाला. परंतु अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारधारेला विराेध करणारी पुस्तके विक्रीस असल्याने अामच्यावर शहरी नक्षलीचा अाराेप करत स्टाॅल बंद केल्याचा अाराेप हरिती प्रकाशनाच्या शाम घुगे यांनी केला अाहे. 

    घुगे म्हणाले, संविधान दिनी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या अाणि काही विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार अाम्ही महापुरुषांवरच्या तसेच विविध लेखकांच्या पुस्तकांचा स्टाॅल विद्यापीठात लावला हाेता. हा स्टाॅल लावत असल्याचे विद्यापीठाला पत्राद्वारे कळवले हाेते. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अाम्ही शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारी पुस्तके विकत असल्याचा अाराेप करत अाम्हाला धक्काबुक्की केली. ज्या जेएनयु डायरी या पुस्तकाचा उल्लेख केला जाताेय ते पुस्तक कायदेशीर प्रकाशाकडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. तसेच कन्हैया कुमार व त्याचे सहकारी हे देशद्राेही अाहेत की नाही हे न्यायालय ठरवेल. त्यांना देशद्राेही ठरविण्याचा अधिकार अभाविपला काेणी दिला. अाम्हालाही अभाविपकडून शहरी नक्षली अाणि देशद्राेही म्हणून संबाेधण्यात अाले.


 
    अभाविपचे अाबासाहेब काळे म्हणाले, हरिती प्रकाशनाला परवानगी नसताना त्यांनी विद्यापीठात स्टाॅल लावला. या स्टाॅलवर शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारी पुस्तके हाेती. त्यामुळे परवानगीशिवाय अशा पुस्तकांचा स्टाॅल कसा काय लावला याची विचारणा अाम्ही केली. महापुरुषांची पुस्तके विकण्याला अामचा विराेध नाही. परंतु यातील अनेक पुस्तके ही अारएसएस विराेधी अाणि शहरी नक्षली समर्थन करणारी हाेती. त्यामुळे अाम्ही विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. 

    एनएनयुअायच्या रुक्साना शेख म्हणाल्या, हरिती पब्लिकेशनने विद्यापीठात स्टाॅल लावला हाेता. त्याबाबत त्यांनी विद्यापीठाला पत्र दिले हाेते तसेच ते मिळाल्याचा अभिप्राय सुद्धा घेतला हाेता. अभाविपने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा स्टाॅल लावला हाेता त्या स्टाॅलला सुद्धा विद्यापीठाला पत्र मिळाल्याचा अभिप्राय हाेता. त्यावर कुठेही परवानगी दिल्याचे म्हंटले नव्हते. अभाविपचे कार्यकर्ते जे म्हणतायेत त्याप्रमाणे शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारे कुठलेच पुस्तक या स्टाॅलवर नव्हते. असे कुठले पुस्तक अाहे याबाबत त्यांना सांगता येत नाही. विद्राेही साहित्यातील पुस्तके विकणे म्हणजे शहरी नक्षलवादाचे समर्थन असे हाेत नाही. त्यामुळे अभाविपच्या दाव्यात कुठलिही सत्यता नाही. 

Web Title: freedom of speech refused on the constitution day ; incident at pune university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.