शिरूरमध्ये वाहतळाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:52+5:302021-03-09T04:13:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : बेशिस्ट वाहने उभे केल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिरूर शहरात एका ९ वर्षीय बालकांना आपला जीव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : बेशिस्ट वाहने उभे केल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिरूर शहरात एका ९ वर्षीय बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर बेशिस्त उभ्या केलेल्या वाहनांवर करण्यात आलेली कारवाई ही देखाव्या पुरतीच होती. आजही रस्त्याच्या दुतर्फा नो पार्कींग असे लिहिले असतांनाही अनेकांच्या मोटारी रस्त्याच्या बाजुलाच लावल्या जात असल्याने शिरूरमध्ये वाहतूक नियोजन कोलमडले आहे. नागरिकांना मानवनिर्मित वाहतूककोंडीला रोज सामोरे जावे लागत आहे.
शिरूला १ जानेवारीला जुन्या नगर पुणे रस्त्यावर इंदिरागांधी पुतळ्याजवळ रस्त्यावर बेशिस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे दुचाकीवरील लहान मुलगा टॅकरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आमदार अशोक पवार यांनी शासकीय विश्राम गृह येथे तातडीची बैठक घेऊन शिरुर शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी शिरुर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाला रस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजुने बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. यानंतर शिरुर शहरातील जुन्या नगर पुणे रस्त्यावर वाहतुक कोंडी होणाऱ्या भागातील
बसस्थानकासमोरील फळ वाले, फुलवाले यांचे स्टॉल असणारे अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाई नंतर नगरपरिषदेने वाहनतळाचे फलक जुन्या नगर पुणे मार्गावर वाहतुक कोंडी होणाऱ्या भागात लावले. परंतु हे फलक नागरीकांना वाचण्या पुरतेच दिसत आहे. मात्र, आजही बसस्थानक ते तहसिल कार्यालय या परिसरात रस्त्याच्या कडेला दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याने वाहतूककोंडी आजही कायम आहे.
फोटो ओळी : शिरूर नगरपरिषद कार्यालय परिसरात कार्यालय परिसरातील वाहने व त्यामुळे बसवाहतुकीस अडथळा होऊन होणारी वाहतुककोंडी.