साफसफाई न करता डाव्या कालव्यात सोडले आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:32+5:302021-02-16T04:11:32+5:30
जुन्नरचा पूर्व पट्टा आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नरच्या बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, उंब्रज, ...
जुन्नरचा पूर्व पट्टा आणि नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नरच्या बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, उंब्रज, काळवाडी आदी गावांना या कालव्याच्या पाण्याने एक नवजीवनच मिळाले आहे. मात्र, अलीकडे या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी अगदी कॅनॉलच्या अस्तरीकरणास मोठमोठी बाभळीची झाडे आली आहेत. तसेच कॅनॉलमध्ये दगडगोट्यांसह इतरही घाण पसरली आहे. त्याची साफसफाई न करताच आवर्तन सोडल्याने अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. या कॅनॉलला उंब्रज, पिंपरी पेंढार, वाळुंजवाडी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आणि कालव्यातील घाण वाढलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने पुढे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाने यावर त्वरित कार्यवाही करून स्वच्छता करावी, जेणेकरून भविष्यात कॅनॉलचे होणारे नुकसान टाळले जाईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
१५ आळेफाटा
साफसफाई न करता पाणी सोडल्याचे दृश्य