पिंपरी-चिंचवड | महिलेच्या घरच्यांना धमकी देऊन वारंवार बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:30 IST2022-04-19T20:30:00+5:302022-04-19T20:30:01+5:30
लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध...

पिंपरी-चिंचवड | महिलेच्या घरच्यांना धमकी देऊन वारंवार बलात्कार
पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर शारीरिक संबंधाबाबत फिर्यादीच्या घरच्यांना धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. त्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरल्यावर आरोपीने त्याच्या मनाप्रमाणे वस्तू घेऊन स्वत:कडेच ठेवल्या आणि फसवणूक केली.
हा प्रकार रावेत येथे ९ जानेवारी २०२२ रोजी घडला. संबंधित महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक केली आहे. इंद्रनील आलोक बोस (वय २९, रा. उंड्री, सासवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रास्थापित केले व घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. त्यानंतर कोर्ट मॅरेज करण्याचे ठरल्यावर आरोपी फिर्यादीच्या बहिणीकडून मनाप्रमाणे वस्तू खरेदी केल्या व स्वत:कडेच ठेवत फसवणूक केली.