नव्या वर्षात सोडणार आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:26+5:302020-12-30T04:15:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : डिंभे उजवा कालवा तसेच घोड व मीना कालव्यांचे आवर्तन २० जानेवारी पासून, कुकडी ...

Frequent release in the new year | नव्या वर्षात सोडणार आवर्तन

नव्या वर्षात सोडणार आवर्तन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : डिंभे उजवा कालवा तसेच घोड व मीना कालव्यांचे आवर्तन २० जानेवारी पासून, कुकडी डावा कालव्यातून १ फेब्रुवारीपासून तर पिंपळगांव जोगे धरणातून १० फेब्रुवारी पासून आर्वतन सोडण्यात येणार आहे. या सोबतच घोड, मीना, कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यात आवश्यकते नुसार पाणी सोडण्याचा निर्णय पुण्यात कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती नियोजन बैठकीत सोमवारी झाला.

कुकडी व घोड प्रकल्पातील कालवे, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्ती तसेच नविन कामांसाठी निधीचे निजयोन या बाबत सोमवारी पुण्यात कालवा समितीची बैठक झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपत्तीभवन येथे ही बैठक झाली. या बैठकीस राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कर्जतचे आमदार रोहितदादा पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार, करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपुत, अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, एस.जे. माने हे उपस्थित होते. या बैठकीत आर्वतन सोडण्याच्या निर्णयाबरोबरच डिंभे डावा व उजवा कालवा व घोड कालवा पाणी गळती संदर्भात तसेच घोड, मीना, कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्ती तसेच नव्याने करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली. यामध्ये डिंभे डावा कालवा दुरूस्तीसाठी २२. ८५ कोटी, डिंभे उजवा कालवा २ कोटी, घोड शाखा कालवा ९ कोटी, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे १ कोटी व नविन अस्थीकरण व राहिलेल्या कामांसाठी १०० कोटी रूपयांची मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली.

चौकट

डिंभे डावा कालवा दुरूस्तीसाठी मागणी केलेल्या निधी मधून प्रामुख्याने गळती प्रतिबंधक व कालवे फुटण्याच्या ठिकाणची कामे होणार आहेत. घोड शाखेच्या कालव्यांसाठीच्या ९ कोटी मधून अस्थरीकरण व खोल खोदाईची काम होणार आहे. यामध्ये कळंब ते लौकी दरम्यान चांडोली, थोरांदळे, जाधववाडी, मांजरेवाडी येथील खोलखोदाईची कामे होणार आहेत. डिंभे उजव्या कालव्यां वरील धोकादायक झालेल्या मोऱ्यांची दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहेत.

चौकट

घोड नदीवरील खडकी पिंपळगांव, काठापुर येथील कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, मीना नदीवरील नागापुरचा को.पं.बंधारा, कुकडी नदीवरील भाकरेवाडी, शरदवाडी, वडनेर, म्हसे खुर्द येथील को.प.बंधारे दुरूस्ती केली जाणार आहेत.

कोट

कुकडी व घोड प्रकल्पातील कालवे, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्तीसाठी १३० कोटी रूपयांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे याबैठकीत केली. यापैकी तातडीने करावयाच्या विशेष दुरूस्तीसाठी ३० कोटी रूपये बिगर सिंचन मधून जलसंपदा मंत्र्यांनी उपलब्धही करून दिले. यातून धोकादायक झालेल्या कालव्यांची व कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरूस्तीचे कामे लगेच सुरू होतील. तर उर्वरीत कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात भरिव तरतुद केली जाईल असे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री

28122020-ॅँङ्म-ि02 झ्र पुणे येथे कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या नियोजन बैठक ीत बोलताना दिलीप वळसे पाटील, यावेळी उपस्थित जलसंपदा मंत्री जयंत पाटील, रोहित पवार

28122020-ॅँङ्म-ि03 झ्र डिंभे धरण

Web Title: Frequent release in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.