उंडवडी परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:04+5:302021-05-10T04:10:04+5:30
उंडवडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत आहे. दोन दिवसांंपूर्वी सौंदडवाडी येथील हरपळे-ढोरे फार्म येथे दोन कुत्र्यांवर हल्ला ...
उंडवडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत आहे. दोन दिवसांंपूर्वी सौंदडवाडी येथील हरपळे-ढोरे फार्म येथे दोन कुत्र्यांवर हल्ला करत फडशा पाडला. त्यानंतर पुन्हा सौंदडवाडी येथे विष्णू गवळी, अमित गवळी हे शेतात काम करत असताना अचानक त्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी लगेच गावच्या सरपंच दीपमाला जाधव यांना माहिती दिली. रात्री उशिरा माजी सरपंच सचिन गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे, राजेंद्र नवले, आकाश होले, अमोल होले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वनविभागाचे अधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली असून पावलांच्या ठशांवरून बिबट्या दीड ते दोन वर्षांचा असावा असा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.