Pune Corona News: शुक्रवारी आठवड्यानंतर एका दिवसांत ११३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:20 PM2021-11-19T20:20:00+5:302021-11-19T20:20:06+5:30
आज दिवसभरात ७५ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे
पुणे : शहरात शुक्रवारी एक आठवड्यानंतर प्रथमच एका दिवशी शंभरच्या पुढे म्हणजेच ११३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ८४६ वर आली आहे. दरम्यान आज दिवसभरात ७५ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ४४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आज बाधितांची टक्केवारी १.४८ टक्के इतकी आहे. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या ९९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७४ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३६ लाख ३९ हजार ३९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ५ हजार ७८० जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ८४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरात ९ हजार ९२ जणांचा मृत्यू झाला आहे.