शुक्रवारी २३८ कोरोनाबाधित, २३७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:54+5:302021-08-14T04:14:54+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी २३८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात शुक्रवारी २३८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार २११ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ५८ टक्के इतकी आढळून आली आहे.
दरम्यान आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार १२५ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १९८ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३११ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २९ लाख ८६ हजार ४९२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार ९७० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७९ हजार ८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.