शुक्रवारी, २४१ कोरोनाबाधित : २३९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:57+5:302021-09-11T04:11:57+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी २४१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात शुक्रवारी २४१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ३२९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.८९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार २२४ इतकी आहे. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २१४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ३० हजार ४५७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार ८५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार ६६० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.