शुक्रवारी २५८ बाधित, तर २४६ झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:17+5:302021-06-26T04:09:17+5:30

पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात २५८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ६ जणांचा ...

On Friday, 258 were affected, while 246 were cured | शुक्रवारी २५८ बाधित, तर २४६ झाले बरे

शुक्रवारी २५८ बाधित, तर २४६ झाले बरे

Next

पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात २५८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजार ५२२ सक्रिय रुग्ण आहेत.

खासगी तसेच शासकीय स्वॅब तपासणी केंद्रांवर ५ हजार ७९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.४६ टक्के होती. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील शुक्रवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१४ रुग्ण गंभीर असून ४४३ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ४० हजार ५५० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ८४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६६ हजार २ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ५२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: On Friday, 258 were affected, while 246 were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.