शुक्रवारी २६९ बाधित, तर २२० झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:57+5:302021-07-03T04:08:57+5:30

पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात २६९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू ...

On Friday, 269 were affected, while 220 were cured | शुक्रवारी २६९ बाधित, तर २२० झाले बरे

शुक्रवारी २६९ बाधित, तर २२० झाले बरे

Next

पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात २६९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ७४८ सक्रिय रुग्ण आहेत.

खासगी तसेच शासकीय स्वॅब तपासणी केंद्रांवर ६ हजार ६९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४ टक्के होती. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील शुक्रवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८५ रुग्ण गंभीर असून ४२१ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ८१ हजार १४३ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७९ हजार ७२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६७ हजार ७२५ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: On Friday, 269 were affected, while 220 were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.