अपहरण करून मित्रचा केला खून
By admin | Published: September 18, 2014 12:09 AM2014-09-18T00:09:59+5:302014-09-18T00:09:59+5:30
पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
Next
पुणो : पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
नितेश मोहन केसरी (21, सध्या रा. वडगाव बुद्रुक. मुळ रा. झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी प्रशांत रमेश वाघवले (वय 2क्), प्रवीण चंद्रकांत खांबे (2क्) आणि तुषार राजेंद्र जाधव (23, तिघे रा. स.नं. 13क्, दांडेकर पूल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका 16 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नितेश हा लॉटरीच्या दुकानात काम करीत होता. भाऊ मुकेश आणि राकेश यांच्यासह राहण्यास असलेल्या नितेश 11 सप्टेंबरला बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबरला सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा सिंहगड रस्ता आणि दत्तवाडी पोलीस संयुक्तपणो तपास करीत होते.
दत्तवाडी पोलिसांना नितेशचा खून झालेला असून त्यामागे प्रवीण आणि तुषार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, संदीप देशमाने, उपनिरीक्षक राजपूत, कर्मचारी सचिन ढवळे, सूरज सावंत, प्रमोद कळंबकर, रघुनाथ जाधव, अशोक गवळी, नीलेश खोमणो आणि नीलेश जमदाडे यांनी आरोपींना उचलले. नितेशला गोड बोलून आरोपींनी 11 तारखेला मोटारसायकलवरून भोर येथे नेले. जबर मारहाण करून त्याचा रुमालाने गळा आवळला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. नितेशचा मृतदेह त्यांनी भोरपासून सुमारे 4क् किलोमीटर दूर भोर-महाड रस्त्याजवळ असलेल्या आशिंपी येथे टाकला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपी पुण्याला आले. (प्रतिनिधी)
4भोर पोलिसांना आशिंपी-पसुरे रस्त्यावर एक मृतदेह पडला असून, दरुगधी येत असल्याची माहिती मिळाली होती. भोर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले.
4पूर्णपणो कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. नितेशचा शोध घेत दत्तवाडी पोलीस भावांना घेऊन भोर परिसरात गेल्यावर त्यांना नितेशच्या मृतदेहाची माहिती मिळाली.
4 नितेशच्या कपडय़ांवरून त्याला भावांनी ओळखले. हा मृतदेह नितेशचाच असल्याची पोलिसांची खात्री झाली. अटकेतील आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिली आहे.