Friendship Day 2018: फ्रेंडशीप डे च्या रंगात रंगली तरुणाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 08:48 PM2018-08-05T20:48:00+5:302018-08-05T20:56:34+5:30

फ्रेंडशीप डे निमित्त तरुणाईचा अावडता एफसी रस्ता तरुणाईने फुलून गेला हाेता. एकमेकांना शुभेच्छा देत तरुणाईने फ्रेंडशीप डे साजरा केला.

Friendship Day 2018: youth celebrete friendship day | Friendship Day 2018: फ्रेंडशीप डे च्या रंगात रंगली तरुणाई

Friendship Day 2018: फ्रेंडशीप डे च्या रंगात रंगली तरुणाई

Next

पुणे : वर्षभर तरुणाई ज्या दिवसाची अातुरतेने वाट पाहत असते ताे म्हणजे मैत्री दिवस अर्थात फ्रेंडशीप डे. प्रत्येकाच्या मनात अापल्या मित्रांसाठी एक खास कप्पा असताे. एकमेकांची सुखः-दुखः शेअर करत ही दाेस्ती तुटायची नायचा नारा तरुणाई देत असते. अाॅगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे म्हणून जगभरात साजरा केला जाताे. पुण्यातील एफसी राेड म्हणजे तरुणाईचं अावडतीचं डेस्टिनेशन. रविवारी फ्रेंडशीप डे अापल्या मित्र-मैत्रिणींसाेबत साजरा करण्यासाठी या रस्त्यावर तरुणाईने माेठी गर्दी केली हाेती. 

    सध्याच्या अाॅनलाईन मैत्रीमध्ये सेल्फीला माेठं महत्त्व प्राप्त झालं अाहे. अापले जवळचे मित्र-मैत्रिण साेबत असतील अाणि त्यातही फ्रेंडशीप डे असेल तर सेल्फी ताे बनता है. एफसी रस्त्यावर तरुणाईने फ्रेंडशीप डे साजरा करत मनसाेक्त सेल्फी काढले. एकमेकांची गळाभेट घेत फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा दिल्या. अापल्या मैत्रिचं प्रतिक म्हणून अनेकजण एकमेकांना विविध प्रकारचे फ्रेंडशीप बॅंड बांधत हाेते. काहींनी तर अापल्या मित्र-मैत्रिणीचं नावं तयार करुन घेत  त्यांना फ्रेंडशीप बॅंड बांधलं. चाॅकलेटलाही या दिवशी माेठं महत्त्व असतं. विविध अाकरांच्या, रंगबेरंगी फुग्यांनी एफसी रस्त्यावर एक वेगळाच माहाेल तयार झाला हाेता. संध्याकाळनंतर या सेलिब्रेशनला एक वेगळाच रंग चढत गेला. चहाच्या टपऱ्यांवर अापली पहिली भेट या ठिकाणी झाली हाेती, काॅलेजमधले दिवस काही वेगळेच हाेते अशा संवादांनी अाठवणींना उजाळा देण्यात येत हाेता. 

    तरुणाईला गवसलेला मैत्रीचा अर्थ म्हणजे स्वातंत्र्य. अापल्या मैत्रीचं नातं साजरं करण्यासाठी असलेल्या या दिवसाला तरुणाईने भटकंतीचे अनेक प्लॅन्सही केले हाेते. हा दिवस उत्साहात, अानंदात साजरा करता यावा यासाठी बाजारपेठाही सजल्या हाेत्या. अाठवड्याभरापासूनच तरुणाईने गिफ्टशाॅप्समध्ये गर्दी केली हाेती. यंदा काय नवीन अापल्या मित्रांना देता येईल याचा शाेध घेण्यात येत हाेता. अापल्या मनातील भावना याेग्य शब्दातून व्यक्त करण्यासाठी ग्रिटींग्जकडेही तरुणाईचा माेठा अाेढा हाेता. विविध कॅफेज, हाॅटेल्समध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळत हाेती. बदलत्या काळात मैत्रीचे अर्थ जरी बदलत असले तरी त्यातील निर्मळता, निस्वार्थीपणा अाजही कायम असल्याचे दिसून अाले. माेबाईलच्या कॅमेरात अाजच्या दिवसाचे क्षण कैद करत तरुणाईने या दिवसाच्या अाठवणी अापल्याकडे साठवून ठेवल्या. 

Web Title: Friendship Day 2018: youth celebrete friendship day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.