फेसबुकवरची मैत्री पडली महागात; परदेशी व्यक्तीकडून तब्बल ५८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:59 AM2022-09-27T08:59:41+5:302022-09-27T09:01:17+5:30
फेसबुक फ्रेंडने केली ५८ लाखांची फसवणूक
पिंपरी : भारतात पर्यटनासाठी आलो असून, आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत. त्यामुळे विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगून फेसबुक फ्रेंडने एका व्यक्तीची ५८ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार २२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत फेसबुक आणि ऑनलाइन माध्यमातून घडला.
श्याम अरविंद ओझरकर (वय ५४, रा. पाटीलनगर, बावधन) यांनी या प्रकरणी रविवारी (दि. २५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. विल्यम अल्बर्ट, बँकेचा एक खातेधारक आणि मोबाइलधारक असलेल्या दोन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विल्यम याच्यासोबत फिर्यादीची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. विल्यम याने तो पर्यटनासाठी भारतात आला असून, त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक डॉलर आहेत. त्यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला ओझरकर यांच्या मदतीची गरज आहे, असे सांगून त्याने ओझरकर यांची दिशाभूल केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल ५८ लाख ७८ हजार ७०० रुपये घेत फसवणूक केली.