पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Published: August 13, 2016 05:16 AM2016-08-13T05:16:22+5:302016-08-13T05:16:22+5:30

यवत पोलिसांनी तक्रारीची दखल घ्यावी, यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांच्या कार्यालयासमोरच तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या

In front of the police station, the complainant's suicide attempt | पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

यवत : यवत पोलिसांनी तक्रारीची दखल घ्यावी, यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांच्या कार्यालयासमोरच तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आज (दि. १२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल वडगुले (वय २८, रा. टाकळी भीमा, ता. दौंड) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विठ्ठल वडगुले याचे भाऊ सोपान वडगुले यांची एकाने फसवणूक केली होती. त्याबाबत फसवणुकीचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. आरोपी जयवंत ऊर्फ काळुराम नारायण वडगुले याने राहू येथील यूको बँकेतून सोपान वडगुले यांच्या बचत खात्यातून ९ लाख २१ हजार बनावट पासबुक व सहीचा वापर करून काढली होती.
फसवणुकीच्या गन्ुह्यातील आरोपीचा जामीन सत्र न्यायालायाने फेटाळला होता. त्यानंतर गुन्ह्याचे फिर्यादी सोपान वडगुले यांनी आरोपीच्याविरोधात गैरसमजुतीने फिर्याद दिले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर आरोपी जयवंत ऊर्फ काळुराम नारायण वडगुले याने अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी घेऊन न्यायालयाने आरोपीला ८ आॅगस्ट २०१६ रोजी जामीन मंजूरदेखील केला होता. त्यानंतर आज (दि. १२) गुन्ह्याचे फिर्यादी सोपान व त्यांचे भाऊ विठ्ठल यांच्यात फिर्यादी सोपान याने आरोपी जयवंत यांच्याकडून फिर्याद मागे घेण्यासाठी ५ लाख रुपये लाच घेतल्याच्या कारणावरून वाद झाले. माघार घेण्यासाठी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्यामधून विठ्ठल याला भाऊ निम्मे पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. यावरून तक्रार पोलीस ठाण्यामध्ये गेली. यावरून संबंधित परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हेदेखील आज दाखल करण्यात आले.
मात्र परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर विठ्ठल वडगुले बाहेर गेला आणि काही वेळाने पोलीस ठाण्याच्या आवारात येत असताना हातात लालसर रंगाचा टीन घेऊन मोठ्याने आरडाओरडा करीत साहेब सोपान याला सोडू नका त्याने फसविले आहे. आता मी जगत नाही, असे म्हणत त्याने विष प्राशन केले. पोलिसांनी विठ्ठल याला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याने विष पिले होते. पोलिसांनी तातडीने त्याला यवत येथील आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणारा विठ्ठल वडगुले याचा भाऊ सोपान वडगुले, भाचे नवनाथ मेमाणे, आनंदा मेमाणे, अनिल मेमाणे यांनी विठ्ठल याच्या घरात जाऊन त्यास मारहाण केली व केस मागे घेण्यासाठी त्याच्यावर दडपण आणले.
त्यांच्या त्रासाला कंटाळून विठ्ठल वडगुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यास परावृत्त केलेबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: In front of the police station, the complainant's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.