बारामती जिंकण्यास पुण्यात मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:16 AM2019-04-05T06:16:33+5:302019-04-05T06:17:39+5:30
बारामतीतल्या रणनितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: पाटील यांनी बैठका घेतल्या.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुण्यातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुख्यमत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्त्व सोपवले आहे. गेले दोन दिवस पुण्यात मुक्काम करुन पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा सपाटा लावला होता. खासदार संजय काकडे यांच्याकडे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.
बारामतीतल्या रणनितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: पाटील यांनी बैठका घेतल्या. बारामतीच्या मोहिमेसाठी पुण्यातून नियुक्त केलेले नगरसेवक गणेश बिडकर, राजेश पांडे तसेच राहुल कुल, वासुदेव काळे, दिलीप खैरे यांच्यासह अनेक प्रमुखांची बैठक पाटील यांनी घेतली. व्यक्तीगत स्तरावर संपर्क साधून कुटूंबातील व्यक्ती, नातेवाईक यांच्या माध्यमातून प्रचार राबवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काकडे यांचे या मतदारसंघात खूप व्यक्तीगत संबध असल्याचे सांगितले जाते.