मानांकित खेळाडूंची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:15 AM2017-08-04T03:15:10+5:302017-08-04T03:15:10+5:30
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशा जोशी
पुणे : पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशा जोशी, अनीहा डिसुझा, पृथा वर्टीकर, अंकिता पटवर्धन, सलोनी शाह, सनत बोकिल, शौनक शिंदे, सनत बोकिल, रजत कदम, रोहन खिंवसरा यांनी गुरूवारी आपापल्या गटांतून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ज्युनिअर (१८ वर्षांखालील) मुलींच्या गटामध्ये झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित इशा जोशी हिने प्रीती गाढवेवर ११-८, ११-९, ११-५ने मात केली. दुसºया मानांकित अंकिता पटवर्धनने स्वप्नाली नारळेवर १६-१४, ६-११, १२-१०, ११-८ने विजय मिळविला. तिसºया मानांकित अनीहा डिसुझाने मृण्मयी रायखेलकर हिचा ११-६, ११-९, ६-११, ११-६ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सातव्या मानांकित पृथा वर्टीकर हिने बिगर मानांकित मयुरी ठोंबरेचे आव्हान ११-६, ११-५, ११-९ने संपवून अंतिम ८ खेळाडूंत स्थान मिळविले. सहाव्या मानांकित सलोनी शाह हिने प्रीती साळुंखेवर ११-६, ११-७, ११-७ने सहजपणे सरशी साधली.
ज्युनिअर मुलांच्या गटामध्ये अव्वल मानांकित सनत जोशीने तेजस मंकेश्वर याला ११-९, ११-६, १५-१३ने नमविले. दुसºया मानांकित शौनक शिंदेने भार्गव चक्रदेव याचा प्रतिकार ११-८, १२-१०, ११-३ने संपविला. अनय कोवेलमुडीने खळबळजनक विजयाची नोंद करताना सातव्या मानांकित आदर्श गोपाळ याला स्पर्धेबाहेर केले. अनयने ही लढत ११-६, ११-९, ७-११, १४-१२ने जिंकली. तिसºया मानांकित रजत कदमने सहज विजयाची नोंद करताना आर्य शेठवर ११-७, ११-७, ११-७ने मात केली. ११वा मानांकित सनत जैन सहाव्या मानांकित रोहन खिंवसराकडून ३-११, ११-९, ९-११,
२-११ने पराभूत झाला.
राजत कदम याने पुरूष गटातूनही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने योगेश अग्रवाल याच्यावर ११-९,
११-६, ११-९ने सरशी साधली. अव्वल मानांकित अनुराग गोटे याने अभिजीत मिठापेल्ली याच्यावर ११-७, ११-७, ११-८ने मात केली.