‘एफआरपी’साठी बारामतीत ठिय्या!

By admin | Published: December 22, 2014 11:41 PM2014-12-22T23:41:40+5:302014-12-22T23:41:40+5:30

छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली

'FRP' in Baramati! | ‘एफआरपी’साठी बारामतीत ठिय्या!

‘एफआरपी’साठी बारामतीत ठिय्या!

Next

बारामती : छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीच्या वतीने काटाबंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, जमावबंदीच्या आदेशामुळे काटाबंद ऐवजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, बाळासाहेब कोळेकर, तानाजीराव थोरात, शिवाजीराव निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, अ‍ॅड. शिवाजी थोरात, अ‍ॅड. संभाजीराव काटे, किशोर मासाळ, गणेशराव फडतरे, जयवंतराव जाचक आदींसह इतर ऊसउत्पादक उपस्थित होते.
या वेळी जाचक म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारकिर्दीत सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. मात्र, आता सत्तापालट झाल्याने सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणारी मंडळी घरी बसली आहे.
छत्रपती कारखान्याचा एफआरपीनुसार पहिला हप्ता २२०४ रुपये असूनदेखील १८०० रुपये देण्यात आला. खासगी कारखानदारांच्या हितासाठीच पहिली उचल ४०० रुपयाने कमी देण्यात आली. वास्तविक पाहता एफआरपी कायद्यानुसार पहिला हप्ता १४ दिवसांच्या आत न दिल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी आम्ही एफआरपी कमी दिल्याने न्यायालयात गेल्याने एफआरपीच्या फरकाची रक्कम कारखान्याला व्याजासह सभासदांना द्यावी लागली. याचा बोजा सभासदांवरच पडला आहे.

Web Title: 'FRP' in Baramati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.