पुण्यातील पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची तब्बल १ कोटी ६० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:06 PM2021-01-20T12:06:07+5:302021-01-20T12:06:31+5:30
चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन दिले.
पुणे : चंदीगड येथे शाखा उडण्यासाठी स्वत: ला व्यापार करण्यासाठी व चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने प्रसिद्ध पीएन. गाडगीळ ज्वेलर्सला १ कोटी ६० लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय ४२, रा. विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहितकुमार शर्मा (वय ५९, रा. दशमेशनगर, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लक्ष्मी रोडवरील पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानात ऑक्टोबर २०१८ ते ४ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान घडला आहे.
रोहितकुमार शर्मा हा पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स येथील कार्यालयात आला. फिर्यादी गाडगीळ यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कंपनीची शाखा चंदीगड येथे उघडण्यासाठी स्वत:ला व्यापार करण्यासाठी व चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन दिले. कर्ज वितरणासाठी व कर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून एकूण १ कोटी ६० लाख ५० हजार रुपये घेतले. पण कोणतेही कर्ज मिळवून न देता घेतलेली रक्कम परत न देता फिर्यादी व त्यांचे कंपनीची फसवणूक केली आहे.