मागणी वाढल्याने फळांचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:50+5:302021-01-04T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्गशीर्ष महिना असल्याने फळांना मागणी वाढली आहे. त्यातच थंडीमुळे उत्पादन घटल्यामुळे नेहमीच्या तुलनेत फळांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्गशीर्ष महिना असल्याने फळांना मागणी वाढली आहे. त्यातच थंडीमुळे उत्पादन घटल्यामुळे नेहमीच्या तुलनेत फळांची कमी आवक होत आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे. खरबूज, पपई, चिक्कू, बोरे, मोसंबी आणि डाळिंबाच्या दरात १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लिंबू, कलिंगड, अननस, पेरु आणि संत्र्यांचे दर स्थिर आहेत.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी २० ते २५ टन, संत्री १० ते १२ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ८०० के्रट, चिक्कू २ हजार गोणी, खरबुजाची ८ ते १० टेम्पो, बोरे ५०० ते ६०० गोणी इतकी आवक झाली.
फळांचे दर पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रतिगोणी) : २००-३५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : २५०-५८०, (४ डझन) : १४०-१५०, संत्रा : (१० किलो) : १५०-३५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : १०-५०, आरक्ता २०-८०. खरबूज : १०- २५,पपई : ८-१३, चिक्कू (१० किलो) १००-६००, पेरू (२० किलो):
४००-६००, बोरे (१० किलो) चमेली : ८०-१८०, उमराण : ४०-६०, चेकनट : ४२०-४६०, चण्यामण्या ५५०, सीताफळ : ४०-१३०.
--
लग्नतिथीमुळे शोभिवंत फुलांना मागणी
सद्यस्थितीत लग्नतिथी असल्याने शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या पार्श्वभूमीवर आवक वाढेल, थंडी घटल्याने उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रविवारी फुलांना बऱ्यापैकी मागणी होती, मात्र दर स्थिर आहेत.