गर्दी जमविल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला फळविक्रेत्याची धक्काबुक्की, लॉकडाऊनमध्ये बारामतीत तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:13 AM2020-04-23T00:13:09+5:302020-04-23T00:28:39+5:30

लॉकडाऊनच्या काळातील तिसरी घटना 

Fruit seller fights with police in Baramati | गर्दी जमविल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला फळविक्रेत्याची धक्काबुक्की, लॉकडाऊनमध्ये बारामतीत तिसरी घटना

गर्दी जमविल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला फळविक्रेत्याची धक्काबुक्की, लॉकडाऊनमध्ये बारामतीत तिसरी घटना

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा,मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल

बारामती : लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर थांबुन कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या खाकी वर्दीला बारामतीत वेगळ्या अनूभवाला सामोरे जावे लागत आहे.फळविक्रेत्यांना हटकणाऱ्या पोलिसाशी हुज्जत घातल्याची घटना शहरात घडली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जळोची, काटेवाडी पाठोपाठ घडलेली ही तिसरी घटना आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,याबाबत शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार  भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), वैभव बाळासो मदने (रा.गवारेफाटा, ता. बारामती) व राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सोमवारी (दि. 20)रोजी दुपारी ही घटना घडली.  शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, पोलिस कर्मचारीनाळे यांच्यासह पोपट कोकाटे, चालक पवार हे सरकारी गणवेशात सरकारी वाहनाने(एमएच-१२ , आरआर-३८४ ) बारामती शहर हद्दीत दुकाने सुरु राहणार नाहीत,यासाठी गस्त घालत होते. शहरातील भिगवण चौक ते टी. सी. कॉलेज रस्त्यावरून ते निघाले होते.यावेळी ख्रिश्चन कॉलनीलगत एका झाडाखाली छोट्या टेम्पोतून टरबूज विक्री केली जात होती. तेथे लोकांची गर्दी जमल्याने पोलिस तेथे गेले. त्यामुळे खरेदीला आलेले लोक तेथून पसार झाले. विक्रेत्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ती सांगितली. यावेळी नाळे यांनी मांडे याला बारामती शहर कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत असताना येथे गर्दी का जमवली अशी विचारणा केली .त्यावर त्याने पोलिसांशी अरेरावी सुरु केली. मी इथेच विक्री करणार, माझी फळे कुठे विकणार असे म्हणत त्याने नाळे यांच्या अंगावर धावून येत गचांडी धरत हाताने मारहाण, धक्काबुक्की सुरु केली.

पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्यांची सोडवणूक करत फळ विक्री बंद करत पोलिस ठाण्यात चला असे या तिघांना म्हटले. यावेळी मांडे हा त्याच्याकडील बुलेट (एमएच-११, सीजे-११११) यावर बसून मी पोलिस ठाण्यात येणार नाही, असे म्हणत तेथून पळून जावू लागला. त्यावेळी त्याला थांबविताना पुन्हा पोलिसांशी त्याची झटापट झाली.या तिघांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा,मारहाण, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
——————————————————

Web Title: Fruit seller fights with police in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.