एफटीआयआय नटले
By admin | Published: March 20, 2017 04:30 AM2017-03-20T04:30:47+5:302017-03-20T04:30:47+5:30
अंधारातील प्रकाशाच्या तिमिरात ‘तिच्या’ चेहऱ्यावर एक अनोखे तेज चढले आहे. लाईट्स, कॅमेरा म्हणत चित्रसंस्कृतीचे दालन खुली करणारी
पुणे : अंधारातील प्रकाशाच्या तिमिरात ‘तिच्या’ चेहऱ्यावर एक अनोखे तेज चढले आहे. लाईट्स, कॅमेरा म्हणत चित्रसंस्कृतीचे दालन खुली करणारी ‘ती’ आज खूपच वेगळी भासत आहे, नववधूचा साज ‘तिला’ चढला असून, उद्या (सोमवारी) साजऱ्या होणाऱ्या आनंदाची घटिका समीप आली असल्यानं ती काहीशी बावरलेली आहे. हे वर्णन वाचून ही ‘नववधू’ कोण? असा प्रश्न पडला ना! ज्या फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय आणि आॅस्कर विजेते कलाकार घडविले, ती संस्था ५७वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेत एफटीआयआयचा इतिहास उलगडणाऱ्या ‘डाऊन मेमरी लेन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरी, ओडिसा येथील प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्या कार्याचे विशेष दालन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याच हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या सहा डिप्लोमा
फिल्म्स या वेळी दाखविल्या जाणार आहेत.
(प्रतिनिधी)