‘एफटीआय’मध्ये चोऱ्या करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:34+5:302020-12-27T04:08:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयाय)मधील सुरक्षा रक्षकाने संस्थेतील पार्किंगमधील दुचाकी गाड्यांच्या बॅटऱ्यांसह इतर ...

FTI thief arrested | ‘एफटीआय’मध्ये चोऱ्या करणाऱ्यास अटक

‘एफटीआय’मध्ये चोऱ्या करणाऱ्यास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयाय)मधील सुरक्षा रक्षकाने संस्थेतील पार्किंगमधील दुचाकी गाड्यांच्या बॅटऱ्यांसह इतर साहित्य चोरले होते. डेक्कन पोलिसांनी अल्पावधीत याचा छडा लावून चोरीच्या मालासह टेम्पो जप्त केला आहे. राहुल राम भांडवे (वय ३२, रा. दत्तवाडी) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

भगवान गणपती शेकापुरे (वय ५७, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. एफटीआयआयमध्ये एकूण ५२ सुरक्षारक्षक असून त्यांचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी आवाराची पाहणी केली असता विद्यार्थी वसतीगृह येथील वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क केलेल्या १० दुचाकी वाहनांंच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणी असलेले लोखंडी खिडक्यांचे ग्रील, पाईप, लोखंडी बॉक्स, ट्युबलाईट कव्हर असा सर्व मिळून १८ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. याची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

त्याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती मिळाली की, एका तीन चाकी टेम्पोतून चोरीचा माल विक्रीसाठी जात आहे. त्यानुसार त्यांनी म्हात्रे पुलाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो येताना दिसला. त्याला काही अंतरावर टेम्पोला पोलिसांनी थांबविले. टेम्पोमधील मालाची तपासणी केली असता एफटीआयआयमध्ये चोरलेला माल त्यात दिसून आला. पोलिसांनी हा चोरीचा माल आणि तो वाहून नेत असलेला २ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला आहे.

राहुल भांडवे याने एफटीआयमध्ये साफसफाईच्या बहाण्याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न् झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, उपनिरीक्षक किशाेर शिंदे, हवालदार संजय शिंदे, कापरे, तरंगे, गोरे यांनी हा तपास केला.

Web Title: FTI thief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.