एफटीआयआय प्रशासन आंदोलनासमोर झुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:12 PM2018-09-11T16:12:21+5:302018-09-11T16:17:02+5:30

स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले.

The FTII administration reverse in agitation | एफटीआयआय प्रशासन आंदोलनासमोर झुकले

एफटीआयआय प्रशासन आंदोलनासमोर झुकले

Next
ठळक मुद्देरद्द लघुपटाचे सादरीकरण : विद्यार्थ्यांनी व्यक्त केला होता संतापअभाविपने धमकी दिल्यामुळे प्रशासनाने या लघुपटाचे प्रदर्शन रदद केल्याचा आरोपअभ्यासक्रमाचा भाग म्हणून होरा लघुपट दिग्दर्शित

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन आॅफ इंडिया ( एफटीआयआय) मधील स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. या लघुपटाच्या सादरीकरणास परवानगी मिळाल्यामुळे प्रशासनाने रदद केलेल्या लघुपटाचे प्रदर्शन सोमवारी सायंकाळी पार पडले. 
   ह्यकबीर कला मंचाह्णच्या एका कलाकाराचा प्रवास दाखविणा-या होरा या लघुपटाचे सादरीकरण एफटीआयआयने गुरुवारी अचानक सुरक्षेचे कारण देऊन रद्द केले. अभाविपने धमकी दिल्यामुळे प्रशासनाने या लघुपटाचे प्रदर्शन रदद केल्याचा आरोप एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने केला होता. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. लघुपटामध्ये काय आहे हे न पाहाताच त्याला  ह्यमाओवादीह्ण ठरवून हे पाऊल उचलण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे होते. विद्यार्थ्यांनी या मुद्द्यावर आंदोलन केल्याने एफटीआयआयला अखेर परवानगी द्यावी लागली. सोमवारी सायंकाळी संस्थेच्या मुख्य थिएटरमध्ये हा लघुपट दाखविण्यात आला.
एफटीआयआयच्या संचालकांशी सतत बोलणी सुरू होती. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांसाठी सादरीकरणाला परवानगी दिली. पण या लघुपटाशी संबंधित व्यक्तींना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांचे ओळखपत्र जमा करा, मग ठरवू असे सांगितले गेल्याने विद्यार्थ्यांनी हे शक्य नसल्याचे कळवले. त्यावर एफटीआयआयने विद्यार्थी आणि विशेष निमंत्रित व्यक्तींसाठी परवानगी दिली. गोंधळाविना हे सादरीकरण पार पडले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नचिमुथू हा एफटीआयआयह्णमध्ये दिग्दर्शन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून तो संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्याने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून   होरा लघुपट दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: The FTII administration reverse in agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.