अभिव्यक्तीच्या नावावर रंगवल्या भिंती ; एफटीअायअायच्या दाेन विद्यार्थ्यांचा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:37 PM2018-07-09T17:37:14+5:302018-07-09T17:40:00+5:30
नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढून दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. त्यावर संस्थेने दाेन विद्यार्थ्यांना तातडीने वसतीगृह साेडण्यास सांगितले अाहे.
पुणे : राष्ट्रीय चित्रपट अाणि दुरचित्रवाणी संस्था (एफटीअायअाय) मधील दाेन विद्यार्थ्यांनी काढलेल्या दाेन चित्रांमुळे पुन्हा एकदा एफटीअायअायमध्ये वाद निर्माण झाला अाहे. नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे उद्घाटन हाेऊन एकच दिवस झाला हाेता ताेच दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढून कॅंन्टीन विद्रूप केले अाहे. त्यामुळे संस्थेच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना वसतीगृह रिकामे करण्याची नाेटीस दिली अाहे.
एफटीअायअाटचे कॅन्टीन नूतनिकरणासाठी काही दिवस बंद हाेते. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचे उद्घाटन करण्यात अाले. उद्घाटन झाल्यानंतर एका दिवसातच संस्थेतील दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढली. या चित्रांमध्ये एका चित्रात कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या हम देखेंगे या अाेळी लिहिण्यात अाल्या अाहेत. रात्रीच्या वेळी हेतुपुरस्पर दहशत पसरविण्याच्या हेतून ही चित्रे काढली असल्याचे एफटीअायअायचे संचालक भूपेंद्र कॅंथाेला यांचे म्हणणे अाहे. विशेष म्हणजे सुरुक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली. प्रशासनाने केलेली कारवाई ही अभिव्यकीवर हल्ला असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे, तर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी त्या दाेन विद्यार्थ्यांनी केलेली कृती ही चुकीची असल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले.
नाव न लिहिण्याच्या अटीवर एफटीअायाअायचा एक विद्यार्थी म्हणाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच असले पाहिजे. परंतु नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंती तसेच दरवाज्यावर चित्र काढण्याला अभिव्यक्ती म्हणता येणार नाही. तुमची अभिव्यक्ती ही तुम्ही तयार करणाऱ्या फिल्म्स मध्ये दाखवा. अश्याप्रकारे कॅन्टीन विद्रुप करण्याचा हक्क त्यांना काेणी दिला. त्यामुळे प्रशासनाने कारवाई केली तर त्यात चूक काही नाही. दुसरा एक विद्यार्थी म्हणाला, अनेक विद्यार्थी हे सबमिशनमध्ये असल्याने त्यांनी या वादात पडायचे टाळले. अश्याप्रकारे चित्र काढण्याची गरज नाही. अनेक विद्यार्थ्यांचा या कृतीला पाठींबा नाही. अभिव्यक्ती दुसरीकडे दाखवायला हवी.
------------------------------
दाेन विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्र व घाेषणा लिहून कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. रात्रीच्या वेळेस हे काम केले असून एफटीअायअायच्या सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थी थांबले नाहीत. नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनचे उद्घाटन हाेऊन एक दिवस झाला हाेताे ताेच विद्यार्थ्यांनी ते विद्रूप केल्याने ते कदापी स्वीकारण्यासारखे नाही. एफटीअायअायच्या माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे काैतुक केले हाेते. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनी देखील या कृत्याचा निषेध केला अाहे.
- भूपेंद्र कॅंथाेला, संचालक एफटीअायअाय