‘एफटीआयआय विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला’

By Admin | Published: October 16, 2015 12:43 AM2015-10-16T00:43:37+5:302015-10-16T00:43:37+5:30

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात

'FTII students refuse bail' | ‘एफटीआयआय विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला’

‘एफटीआयआय विद्यार्थ्यांचा जामीन फेटाळला’

googlenewsNext

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी बारा जणांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी फेटाळला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
रणजित गोपालकृष्णन नायर (वय २६), विनिता सरोज नेगी (२४), केपहस प्रणेता सुब्बा (२८), यशस्वी राजेंद्र मिश्रा (२८), शायनी जयाराजन कोट्टायी (२३), क्रितिका पांडे (२४), ग्यान गुरव (३१), अश्विनी शर्मा (२९), के गोंविंद राजू (२९), अजय यादव (३२), अजयन के. अडत (२७), के. हरिशंकरनाचीमुथ्थू (२६) यांचा जामीन फेटाळला आहे. या सर्वांना आॅगस्ट महिन्यामध्ये न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. हा जामीन न्यायालयाने कायम न करता फेटाळला. विकास मल्लिकार्जुनराज अर्स (वय ३०, रा. म्हैसूर), हिमांशू प्रजापती (२६), सचित पॉलोस (२७, दोघेही रा. बंगळुरू), अमेय विवेक गोरे (२९, रा. ठाणे पश्चिम) व राजू विष्णू विश्वास (२८, रा. नवी दिल्ली) यांना अटक केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: 'FTII students refuse bail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.