इंधन दर वाढीचा फटका ! पीएमपीएमएल चा बस सीएनजी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:56 PM2021-06-12T12:56:42+5:302021-06-12T13:21:34+5:30
प्रदूषण कमी करण्यासाठी होणार फायदा
इंधनांच्या वाढत्या दरांचा फटका आता पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला देखील बसला आहे. प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी पीएमपीएमएल ने आता डिझेल बसेसचे रूपांतर सीएनजी बसेस मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे महानगर परिवर्तन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन मध्ये बस बंद असल्याने आणि नंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवल्याने पीएमीएमएलचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पीएमीएमएलच्या एकुण २३३ बसेस या आता सीएनजी बसेस मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. सुरुवातीला यासाठी ५ बस प्रायोगिक तत्वावर रुपांतरीत करण्यात येणार आहेत. यानंतर इतर बस देखील बदलल्या जातील.
याविषयी बोलताना पीएमीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थपकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले "सीएनजी बसेस मुळे प्रदूषण कमी होणार आहे.तसेच बस चा इंजिन चे आयुष्य देखील वाढेल. त्याच बरोबर एकुण खर्च देखील कमी होईल. तसेच यासाठीचा खर्च वर्षभराचा आताच वसूल होईल."