मोक्का कारवाईतील फरार आरोपी जेरबंद! दोन पोलीस ठाण्यात त्याच्यावर ११ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 06:22 PM2021-05-23T18:22:23+5:302021-05-23T18:22:30+5:30

अडीच वर्षे होता येरवडा कारागृहात

Fugitive accused in Mocca operation arrested 11 cases were registered against him in two police stations | मोक्का कारवाईतील फरार आरोपी जेरबंद! दोन पोलीस ठाण्यात त्याच्यावर ११ गुन्हे दाखल

मोक्का कारवाईतील फरार आरोपी जेरबंद! दोन पोलीस ठाण्यात त्याच्यावर ११ गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देयेरवडा कारागृहातून सुटल्यावर १५० हुन अधिक समर्थकांनी काढली होती रॅली

पुणे: मोक्का गुन्ह्यातील फरार गुन्हेगार शुभम कामठे याला लोणीकाळभोर पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले. शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवाकवस्ती) याच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी अशा स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.

शुभम कामठे हा जवळपास अडीच वर्षे येरवडा कारागृहात होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्याला ऑगस्ट २०२० मध्ये जामीन मिळाला होता. त्यावेळी सुमारे १५० हून अधिक समर्थकांनी येरवडा कारागृहापासून त्याची रॅली काढली होती. त्याच्या समर्थकांनी संपूर्ण सोलापूर रोड अडवला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता.

हडपसर येथे एका जण एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याला शुभम कामठे व त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्यासह टोळीवर मोक्का एप्रिलमध्ये मोक्का कारवाई केली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अमित साळुंखे, निखील पवार यांना शुभम कामठे हा सोरतापवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज पहाटे सापळा रचला. शुभम हा सोरतापवाडी येथील गोल्डग ड्रिस लॉजचे समोर आला. त्याला पोलिसांची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन काही अंतरावर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व दोन काडतुसे आढळून आली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title: Fugitive accused in Mocca operation arrested 11 cases were registered against him in two police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.