४ वर्षे फरारी एजंट सुरतहून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:14+5:302021-07-14T04:13:14+5:30
पुणे : वेश्या व्यवसायासाठी नेपाळमधील तरुणी पुरविणाऱ्या व मोक्का कारवाई केल्यानंतर गेली ४ वर्षे फरार असलेल्या एजंटला खंडणीविरोधी पथकाने ...
पुणे : वेश्या व्यवसायासाठी नेपाळमधील तरुणी पुरविणाऱ्या व मोक्का कारवाई केल्यानंतर गेली ४ वर्षे फरार असलेल्या एजंटला खंडणीविरोधी पथकाने सुरतहून अटक केली.
एजंट शिवा राजकुमार चौधरी (वय ३७, रा. नेपाळ) असे त्याचे नाव आहे. शिवा चौधरी हा नेपाळमधील तरुणींना फूस लावून नोकरीचे आमिष दाखवून भारतातील विविध शहरात आणत. त्यांना तेथे वेश्या व्यवसायाला लावत असत. त्याच्याविरुद्ध २०१७ मध्ये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा शिवा हा नेपाळला पळून गेला होता. अनैतिक व्यापार प्रकरणात प्रथमच मोक्का कारवाई करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना शिवा हा सुरतमध्ये मित्राकडे आला असून तेथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार झंजाड, हवालदार प्रदीप शितोळे, प्रवीण पडवळ यांचे पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिवा याला पकडून अटक केली.