खुनाचा प्रयत्नातील फरार गुंड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:23+5:302021-02-17T04:14:23+5:30
पुणे : किकवी ग्रामदैवताच्या छबिनाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या भांडणातून अवधूत भोसले यांच्यावर तलवारी, कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात ...
पुणे : किकवी ग्रामदैवताच्या छबिनाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या भांडणातून अवधूत भोसले यांच्यावर तलवारी, कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात २ वर्षांपासून फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पकडले.
सागर अशोक ढोकळे (वय ३०, रा. सुतारदरा, कोथरूड) असे या गुंडाचे नाव आहे. अवधूत भोसले यांच्या घरात घुसून आरोपींनी फिर्यादीची आईच्या डोक्यात व हातावर तलवारीने वार करून जखमी केले आहे. ही घटना २८ एप्रिल २०१९ रोजी झाली होती. आरोपींपैकी आकाश निगडे, शुभम निगडे, हृषीकेश कोंडे, हृतिक अहिरे यांना अटक केली होती. पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना सागर ढोकळे हा सुतारदरा येथे येणार आहे, याची माहिती मिळाली. त्याची खात्री केल्यावर पोलिसांनी सागर ढोकळे याला अटक केली.