फरार खालिस्तानी अतिरेक्याला दिल्ली विमानतळावर एनआयएकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:49+5:302020-12-24T04:12:49+5:30

पुणे : वेगळ्या खालिस्तान राज्यासाठी भारतातील शीख दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली एनआयएने फरारी खलिस्तानी दहशतवादी गुरजीतसिंग ...

Fugitive Khalistani militant arrested by NIA at Delhi airport | फरार खालिस्तानी अतिरेक्याला दिल्ली विमानतळावर एनआयएकडून अटक

फरार खालिस्तानी अतिरेक्याला दिल्ली विमानतळावर एनआयएकडून अटक

Next

पुणे : वेगळ्या खालिस्तान राज्यासाठी भारतातील शीख दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली एनआयएने फरारी खलिस्तानी दहशतवादी गुरजीतसिंग निज्जर याला मंगळवारी दिल्ली विमानतळावर अटक केली. गुरजीतसिंग निज्जर याला सायप्रसमधून हद्दपार करुन भारतात परत पाठविले होते.

महाराष्ट्र एटीएसने २ डिसेंबर २०१८ मध्ये चाकण येथे हरपालसिंग नाईक याला बेकायदा बंदूक आणि ५ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना एटीएसने मोहिउद्दीन सिद्दिकी ऊर्फ मोईन खानलाही अटक केली होती. या प्रकरणात ते संशयित आरोपी होते. १० जानेवारी २०१९ रोजी एनआयएने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान सिंह, सिद्दिकी आणि फरार आरोपी गुरुजीतसिंग निज्जर यांनी खालिस्तान राज्य स्थापनेसाठी दहशतवादी कृत्य करण्याचा गुन्हेगारी कट रचला होता. त्याद्वारे सुरक्षा, अखंडता आणि भारताचे सार्वभौमत्व तसेच शीख दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत होते. गुरुजितसिंग हा मुख्य सूत्रधार असून फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप आणि आयएमओमार्फत सायप्रसमधील त्याच्या साथीदारांसोबत काम करतो.

खालिस्तानच्या वेगळ्या राज्यासाठी गुरजितसिंग निज्जर, हरपालसिंह आणि मोईन खान हे जुने व्हिडिओ, फोटो टाकून खालिस्तानी चळवळीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत होते.

गुरजितसिंग निज्जर हा १९ ऑक्टोबर २०१७ रोजी सायप्रसला पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला मंगळवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. त्याची प्रवासादरम्यानची कोठडी एनआयएने घेतली असून त्याला पुढील तपासासाठी मुंबईला आणण्यात येणार आहे.

Web Title: Fugitive Khalistani militant arrested by NIA at Delhi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.