द फुलब्राईट डायरीज’ नाट्यशास्त्र अभ्यासकांनाही मार्गदर्शक : चंद्रदासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:55+5:302020-12-28T04:06:55+5:30
प्रयत्न, फेलोशिप मिळाल्यानंतर अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठात शिकविताना आलेले अनुभव, अमेरिकेतील विविधांगी संस्कृतीची ओळख, भारतात परत आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात घडलेले ...
प्रयत्न, फेलोशिप मिळाल्यानंतर अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठात शिकविताना आलेले अनुभव, अमेरिकेतील विविधांगी संस्कृतीची ओळख, भारतात परत आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात घडलेले बदल यांवर आधारित असलेले ‘द फुलब्राईट डायरीज’ हे पुस्तक ही फेलोशिप मिळवू इच्छिणा-यांनाच नव्हे तर नाट्यशास्त्र अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास केरळमधील लोकधर्मी थिएटर समूहाचे दिग्दर्शक व कला दिग्दर्शक चंद्रदासन यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी अमेरिकेतील फुलब्राईट फेलोशिप ‘कल्चर, कम्युनिटी अॅन्ड थिएटर : द इंडियन पर्सपेक्टिव्ह’ विषयी पुण्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. अजय जोशी यांना मिळाली आहे. ही फेलोशिप मिळवल्यानंतर अमेरिकेतील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी लिहिलेल्या ‘द फुलब्राईट डायरीज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यासह दिल्ली, केरळ, गुवाहटी तसेच अमेरिकेतही एकाच वेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने झाला.
युनायटेड स्टेटस्-इंडिया एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. आर. सुदर्शन दाश (दिल्ली), वेशभूषाकार प्रा. एलिझाबेथ क्लॅन्सी, दिग्दर्शक प्रा. केव्हिन केटल (अमेरिका), गुवाहाटी विद्यापीठाच्या बरोह महाविद्यालयातील प्रा. मानवेंद्र सरमा हे ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर पुण्यातील कार्यक्रमात फुलब्राईटचे माजी विद्यार्थी अविनाश कुंभार, डॉ. अनघा तांबे तसेच पत्रकार वृंदा जुवळे, प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
या पुस्तकाची प्रस्तावना फुलब्राईटचे माजी विद्यार्थी कला दिग्दर्शक चंद्रदासन यांनी लिहिली आहे. ते म्हणाले, फेलोशिप मिळविण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, लेखकाला अमेरिकेत गेल्यानंतर आलेले अनुभव, अमेरिकेतील नाट्यसंस्कृती बद्दलची त्यांनी मिळविलेली सखोल माहिती तसेच तेथून परत आल्यानंतर लेखकात झालेले सकारात्मक बदल आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेले लिखाण अशा चार विभागात
पुस्तकाची मांडणी अत्यंत सुबक पद्धतीने केली आहे.
---
फुलब्राईट फेलोशिपधारकाच्या भूमिकेत असताना प्रत्येकक्षणी विद्यार्थ्याच्या नजरेतून मी जे-जे काही ग्रहण केले त्याचा उपयोग पुढील पिढीला, फुलब्राईट फेलोशिप मिळवू इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीला व्हावा या आंतरिक इच्छेतून मला या पुस्तकाच्या लेखनाची स्फूर्ती मिळाली.
- डॉ. अजय जोशी, लेखक
फोटो ओळ : द फुलब्राईट डायरीज् पुस्तक प्रकाशन सोहळ्यात (डावीकडून) वृंदा
जुवळे, सुश्रुत कुलकर्णी, डॉ. अजय जोशी, डॉ. अनघा तांबे, अविनाश कुंभार.
(फोटो - फुलब्राइट नावाने आहे.)