मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन

By admin | Published: March 19, 2017 05:14 AM2017-03-19T05:14:43+5:302017-03-19T05:14:43+5:30

पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद

Fund to fund works | मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन

मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन

Next

पुणे : पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १३० कोटी रुपये पुण्यासाठी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारने महामेट्रो ही कंपनी स्थापन केली आहे. अंदाजपत्रकात निधीची तरतूद करताना राज्य सरकारने या तीन व भविष्यात अन्य शहरांमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी म्हणून एकत्रितपणे ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्याच्या वाट्याला किती पैसे येणार, हे स्पष्ट होत नसले तरी साधारण १३० कोटी रुपये मिळतील, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अंदाजपत्रकात फक्त उल्लेख असून, केंद्र सरकार पुरस्कृत ९९० कोटी २६ लाख रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या वर्षासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यासाठी या तरतुदी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले. अंदाजपत्रक पुण्यासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य सरकारने १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा मोठा फायदा पुण्याला होईल.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे म्हणाले, ‘‘स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाझ हे दोन मार्ग आहेत. ३१ किलोमीटरच्या या दोन मार्गांसाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील २० टक्के राज्य सरकार, २० टक्के केंद्र सरकार , १० रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावा लागणार आहे. एकत्रित निधीची तरतूद नको होती.’’

मेट्रोसाठीच्या निधीतून मेट्रोचे काम पुढे नेता येणार आहे. हा पहिल्या वर्षीचा निधी आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सदरम्यानच्या कामाची निविदा या महिनाअखेरीस खुली होईल. त्यादृष्टीने निधीची गरज होती. पुण्याच्या कामाला यातून गती मिळेल व पुढील वर्षी अधिक निधी मिळेल.
- गिरीश बापट, पालक मंत्री

Web Title: Fund to fund works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.