आंबेगावच्या उपविभागीय कार्यालय, निवासस्थानासाठी दोन कोटी ३४ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:26+5:302021-03-07T04:11:26+5:30

शासनाने दिली आहे. मागील पाच वर्षांपासून तोकड्या जागेत दोन तालुक्याचे कामकाज चालू होते. आता सोयीस्कर जागेत कामकाज होईल, अशी ...

Fund of Rs. 2 crore 34 lakhs for Ambegaon Sub-Divisional Office, Residence | आंबेगावच्या उपविभागीय कार्यालय, निवासस्थानासाठी दोन कोटी ३४ लाखांचा निधी

आंबेगावच्या उपविभागीय कार्यालय, निवासस्थानासाठी दोन कोटी ३४ लाखांचा निधी

Next

शासनाने दिली आहे. मागील पाच वर्षांपासून तोकड्या जागेत दोन तालुक्याचे कामकाज चालू होते. आता सोयीस्कर जागेत कामकाज होईल, अशी माहिती कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या अस्मिता भवन इमारतीमागे पशुसंवर्धन खात्याच्या दवाखान्याच्या आवारात उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय तात्पुरत्या जागेत गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. तेथे काम करताना जागा अपुरी पडत होती.येथे अनेक अडचणींवर मात करून कार्यालयीन कामकाज

चालू आहे.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील नागरिक विविध दाखल्यांसाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरिकांचीही

मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. छोट्या जागेमुळे कामकाजात अडथळा निर्माण होत होता. येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम

खात्याने दोन कोटी ३४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते.या कामाला प्रशासकीय मान्यता

दिल्याचे पत्र महसूल व वन विभागाचे राज्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी दिले. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.

Web Title: Fund of Rs. 2 crore 34 lakhs for Ambegaon Sub-Divisional Office, Residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.