माळेगाव येथील क्रीडा संकुलास ८५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:47+5:302021-08-24T04:13:47+5:30
नगरपंचायत माळेगाव येथे तालुका क्रीडा संकूल आहे. क्रीडासंकुलात, रनिंगट्रॅक, बॅडमिंटन, जिम, व्हॉलीबॉल व इतर खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. या ...
नगरपंचायत माळेगाव येथे तालुका क्रीडा संकूल आहे. क्रीडासंकुलात, रनिंगट्रॅक, बॅडमिंटन, जिम, व्हॉलीबॉल व इतर खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. या क्रीडा संकुलात विविध विकासकामासाठी तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी पाठपुरवा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्हा नियोजन मंडळातून ८५ लाखांचा निधी मिळवला. या निधीतून चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक, चालण्यासाठी पाचशे मीटर रनिंग ट्रॅक, ड्रेनेज लाईन, ट्रॅकवर पाणी व्यवस्था व क्रीडा संकुलाची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तर चारशे मीटर ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे.
२०२४ या सालात येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बारामतीचा एक तरी खेळाडू चमकवा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या क्रीडा संकुलात भविष्यात बहुउद्देशीय हॉल, कुस्ती, कराटे व भव्य जिम उभारण्याचा मानस असून जिल्ह्यात एक नंबरचे क्रीडा संकूल तयार करणार असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.
माळेगाव येथील क्रीडा संकुलात चारशे मीटर रनिंग ट्रॅकची पहाणी करताना जगन्नाथ लकडे.
२३०८२०२१-बारामती-०४