इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ९ काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:48+5:302021-02-24T04:10:48+5:30
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्याकरिता ८ कोटी ८० लाख एवढा निधी मंजूर केल्याची ...
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्याकरिता ८ कोटी ८० लाख एवढा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली.उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
कोरोनावर उपाययाेजनांसाठी शासनाचा निधी खर्च हाेत आहे. त्यामुळे जास्त कामे मंजूर होत नाहीत, परंतु आगामी काळात ग्रामीण भागातील रस्ते गावांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध होईल.
जाधववाडी ते सराफवाडी रस्ता (२५ लाख), मदनवाडी सकुंडेवस्ती रस्ता (२६ लाख), अंथुर्णे मस्केवस्ती बिरोबा मंदिर रस्ता (१ कोटी), अंथुर्णे मस्केवस्ती खराडेवस्ती इरिगेशन बंगला रस्ता (९० लाख), काझड ते बापूराव पाटील काळेमळा ते डुमकुरेवस्ती (२५ लाख), कुरवली मोहितेवस्ती रस्ता बंबाडवाडीपर्यंत रस्ता (९० लाख), पिंगळेवस्ती कांबळेवस्ती मोरेवस्ती ते अवसरी रस्ता (६० लाख), जंक्शन वाडकर लोदाडेवस्ती रस्ता करणे (७० लाख), थोरातवाडी हिरेमठमळा मोहितेवाडी रस्ता (३० लाख), गोंदी ते ओझरे रस्ता (५० लाख), काझड रानमळा नरुटेवस्ती रुपनवरवस्ती ते ग्रामा ४३ रस्ता १ कोटी, जाचक वस्ती ते ननवरेवस्ती ते थोरातवस्ती रस्ता (४० लाख), अंथुर्णे ते शिंदेवस्ती जोडमार्ग रस्ता (६० लाख), रामा १२१ ते हनुमान वाडी रस्ता (६० लाख), वडापुरी अवसरी ते प्रजिमा १२५ रस्ता (२५ लाख),१२१ ते येशू पारवाडी लासुर्णे चिखलीमार्ग सुधारणा करणे (३० लाख) असा तब्बल नऊ कोटींच्या आसपास निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होतील. गावाकडील रस्ते असल्यामुळे नागरिकांनी दर्जेदार होण्यासाठी सातत्याने लक्ष देऊन आपले रस्ते परिपक्व करून घ्यावेत, असे आवाहन भरणे यांनी केले.