हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराला निर्माणासाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:27+5:302021-02-17T04:16:27+5:30
मंगळवारी इंदापूर शहरातील ‘भाग्यश्री’ बंगल्यामध्ये छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक संभाजीराव गवारे, जिल्हा संघचालक ...
मंगळवारी इंदापूर शहरातील ‘भाग्यश्री’ बंगल्यामध्ये छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक संभाजीराव गवारे, जिल्हा संघचालक दिलीप शिंदे, प्रांत सदस्य सुनील देशपांडे, प्रांत कार्यकर्ते हेमंतराव हरहरे, व्यवसाय वि. प्रांतमंडळ सदस्य दीपराव पेशवे, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मासाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक अतुल तेरखेडकर यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरण करण्यात आले. यावेळी यावेळी भरत शहा, कैलास कदम, रघुनाथ राऊत, महेंद्र रेडके, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, युवा उद्योजक जावेद शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक व धार्मिक कार्यास सर्वांची मदत व्हावी या उद्देशाने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून नागरिकांना या ऐतिहासिक कार्यास योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व एकूण २१ लाख रुपये निधीचे यामाध्यमातून संकलन करण्यात आले.
--
फोटो क्रमांक : १६ इंदापूर हर्षवर्धन पाटील
फोटो ओळ : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना २१ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.