धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:38+5:302021-07-28T04:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच ...

Funding from Gharkul scheme for rehabilitation of dangerous villages | धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

धोकादायक गावांच्या पूनर्वसनासाठी घरकुल योजनेतून निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : राज्यात अतिवृष्टीमुळे सुरु असलेल्या भुस्स्खलनाच्या घटना पाहता, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकादायक गावांचे कायम स्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी, काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी दिड लाख रूपये मिळणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हातील इतरञ ठिकाणी अशी घटना घडु नये म्हणुन काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी जिल्ह्यातील धोकाग्रस्त गावांचा सर्वेक्षण केले होते. यामध्ये ६० गावे धोकादायक तर १० गावे अति धोकादायक असल्याचे सांगितले होते. यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये असणारे काळवाडी नंबर एक व नंबर दोन (जांभोरी) हे गावे धोकादायक असल्याचे आढळले. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळके वस्ती असे मिळून सत्तर ते ऐंशी घरे असणारे हे गाव आहे. बुधवार (दि २१) पासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहे. या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येवुन मागील पाच सहा दिवसांत घरे कोसळायचे प्रकारही घडले आहेत. पालक मंत्री व जिल्हाधिकारी याच्या आदेशाने दुर्घटना होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जांभोरी काळवाडी व माळीण पसारवाडी या गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा केली.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पाच धोकदायक गांवाची पाहाणी केली. ह्यात ५ पैकी ३ ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे थेट खरेदी प्रस्ताव पंचायत समिती कडून महसुल विभागाकडे गेले आहेत. मंत्री मोहदयांच्या सुचने नुसार महसुल विभाग कार्यवाही करत आहे. यात लाभार्थी म्हणुन घरकुल योजनेतुन दिड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाचा अंदाज घेऊन स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवावे कोणताही धोक पत्करु नये धोकादायक गावातील स्थानिक नागरिकांंनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी आदिवासी नेते मारुती केंगले, जांभोरीचे सरपंच संजय केंगले, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, वसंत पारधी, सुरेश भोकटे, विठ्ठल लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.

चौकट

स्थानिक प्रशासनाने हवामानाचा व पावसाचा अभ्यास करुन विचार करुन कोणताही धोका न घेता लोकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावे असे नियोजन करत आहोत. नागरिकांंनी आपल्या कुंटुबाला व जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सहकार्य करण्याचे सांगितले आहे. तर धोकादायक गांवान मधील लोकांना प्राधान्य देत शासनाच्या शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेतुन लाभ देत असताना घरबांधणी साहित्यासाठी १ लाख २० हजार तर १८ हजार मजुरीसाठी, १२ हजार स्वच्छतागृहासाठी लाभ देत आहोत. ही एक अर्थसाह्य योजना आहे. या योजने अंतर्गत १ लाख ५० हजार रुपये लाभ देता येतो. यात जादा पैसेसाठी लाभार्थी यांनी करावे अथवा इतर योजना विशेष बाब म्हणुन आपत्ती व्यवस्थापन मदत घ्यावी.

-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी

फोटो खालचा मजकुर:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चीम आदिवासी भागातील पाच अति धोकादायक गावांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवुन ग्रामस्थांशी चर्चा केली.

छायाचिञ संतोष जाधव

तळेघर वार्ताहार संतोष जाधव

Web Title: Funding from Gharkul scheme for rehabilitation of dangerous villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.