श्रीराम मंदिरासाठी घोटावडे इंडस्ट्रीयलकडून निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:40+5:302021-03-30T04:06:40+5:30
घोटावडे येथील उद्योजक अर्जुन (तात्यासाहेब) देवकर व रामचंद्र देवकर यांच्या पुढाकाराने या भागात निधी संकलनासाठी आवाहन करण्यात आले होते. ...
घोटावडे येथील उद्योजक अर्जुन (तात्यासाहेब) देवकर व रामचंद्र देवकर यांच्या पुढाकाराने या भागात निधी संकलनासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत घोटावडे परिसरातील उद्योजकांनी सढळ हाताने मदत करून सव्वा तीन लाख रुपये एवढा मोठा निधी मंदिरासाठी जमा केला. यामध्ये तात्यासाहेब देवकर यांनी स्वतः अकरा हजार, रँड पोली प्रॉडक्ट्स प्रा. ली.यांनी दोन लाख पंधरा हजार, सुभाष केमिकल्स इंडिया प्रा.लि. व प्रताप टेक्स केमिकल प्रा. लि.यांनी प्रत्येकी एकावन्न हजार रुपये असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये एवढा निधी श्रीराम मंदिरासाठी देण्यात आला .
यावेळी वैभव कुदळे, अविनाश पवळे,संतोष केसवड, महेश मोहोळ, भाऊ मार्तंड, बाबा भेगडे, प्रसाद सुतार, शिवाजी भेगडे,महेश कोतकर, अद्वैत जगधने,गणेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------
फोटो - घोटावडे, ता. मुळशी येथील इंडस्ट्रीयलच्या वतीने संकलित केलेला निधी श्रीराम मंदिराकरिता सुपूर्द करताना तात्यासाहेब देवकर व आदी.