कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

By राजू हिंगे | Published: August 21, 2023 04:11 PM2023-08-21T16:11:59+5:302023-08-21T16:17:31+5:30

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत

Funds for Katraj-Kondhwa road work will not be reduced; Chandrakant Patil's assurance | कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

googlenewsNext

पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही. जेथे जागा ताब्यात आली आहे. तिथे रस्ताचे काम तातडीने करावे.रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करावी. त्यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी कात्रज ते खडी मशीन चौक मार्गावरील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,वाहतुक पोलिस उपायुक्त विजय मगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनंजय देशपांडे, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश पाटील, विघृत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल , माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम , सामाजिक कार्यकर्त राजाभाउ कदम, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठेआदी उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपीरोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक आणि पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता पूर्ण, त्यापुढे काम झालेच नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे; पण त्यापुढेही काम झालेले नाही. पूर्वीच्या ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी केली जाणार आहे . पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून कात्रज-कोंढवा रस्त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर्स लावण्याचे काम पथ विभागांकडून हाती घेण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे. तीव्र उताराच्या ठिकाणी गतिरोधकपट्ट्या तयार कराव्यात, खडी मशीन चौकातील स्मशानभूमीची जागा स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थलांतरित करावी, अशा सूचना पाटील यांनी केली. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी लागणाऱ्या जागांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मोजणी अधिकारी देण्याचे निर्देश जिल्हाधिक्षक भूमिअभिलेख यांना यावेळी देण्यात आले. रस्त्याच्या आराखड्यात येणाऱ्या महावितरणचे खांब, आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचनाही महावितरणच्या मुख्य अभियंतांना देण्यात आल्या

पाच वर्ष किरकोळ कामे करतो

कात्रज -कोंढवा रस्त्याचे काम पाच वर्षापुर्वी सुरू झाले. पण या पाच वर्षात बस स्टॉप हलविणे, केबल टाकणे यासह किरकोळ कामे करत आहे असे या रस्त्याचे ठेकेदार संदीप पटेल यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले. त्यावर या रस्त्यांच्या कामचा दरमहिन्याला आढावा घेण्यात येईल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री येणार म्हणुन रात्रीतुन केली कामे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी केली. या पाहणीपुर्वी या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने साफसफाईचे काम करण्यात येत होती. रस्त्यांच्या बाजुला असणारे गवतही काढण्यात आले. . तसेच या रस्त्यावरी खडडे बुजविण्याचे काम रविवारी रात्री करण्यात आले. अनेक ठिकाणी डांबर टाकण्यात आले. पालकमंत्री येणार म्हणुन पालिका प्रशासनाने जी कामे तत्परतेने केली. तीच कामे अन्य वेळीही तातडीने करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: Funds for Katraj-Kondhwa road work will not be reduced; Chandrakant Patil's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.